कॉंग्रेस आर्थिक अडचणीत?

नवी दिल्ली: कॉंग्रेसपुढे सध्या आर्थिक समस्या आहे काय? गेल्या पाच महिन्यात विभागीय कार्यालयांना केंद्रीय नेतृत्वाकडून निधी पाठवण्यात आलेला नाही. त्यामुळे कॉंग्रेस आर्थिक अडचणीत असल्याचे जाणवत आहे. खर्च कमी करण्याचे आणि मदत करण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे कॉंग्रेसच्या एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉग्रेसला उद्योगपतींकडून मदत येत असली, तरी ती बरीच कमी झालेली आहे. यामुळे आर्थिक चणचण भासणाऱ्या काँग्रेस पक्षाला आता मदतीसाठी जनतेपुढे हात पसरण्याची वेळ येऊ शकते.

कॉंग्रेसकडे पैसा नसल्याचे सोशल मीडिया प्रमुख दिव्या स्पंदनाने मान्य केले आहे. भाजपाच्या तुलनेत कोंग्रेसला निवडणूक बॉंड्‌मुळे फारसा निधी मिळालेला नाही. संपलेल्या 2017 आर्थिक वर्षात भाजपाला जेवढा निधी मिळाला त्याच्या जेमेतेम 25 टक्के कॉंग्रेसला मिळाला आहे. परिणामी आता ऑनलाईन फंडिंगकडे वळावे लागणार असल्याचे स्पंदना यांनी म्हटले आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)