कॉंग्रेसने काढला हुकमी एक्का; प्रियांका गांधी-वढेरा अधिकृतपणे राजकारणात

पक्षाने केले राष्ट्रीय सरचिटणीस

पुर्व उत्तरप्रदेशचे केले प्रभारी

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीला केवळ दोन-तीन महिनेच बाकी राहिले असताना कॉंग्रेसने आपला हुकमी एक्का बाहेर काढला आहे. पक्षाने प्रियांका गांधी-वढेरा यांना राजकारणात उतरवण्याचा निर्णय घेतला असून त्यांना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीसपद देण्यात आले आहे. सध्या त्यांच्याकडे पुर्व उत्तरप्रदेशच्या प्रभारी म्हणूनही काम सोपवण्यात आले आहे. पक्षाच्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

उत्तरप्रदेशात कॉंग्रेस पक्षाने स्बळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घोषित केल्यानंतर पक्षातर्फे ही घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या राजकारण प्रवेशा विषयी गेले अनेक दिवस चर्चा सुरू होती. पण प्रियांकांची राजकारणातील भूमिका कॉंग्रेसने मर्यादितच ठेवली होती. मध्यंतरी त्यांनी फक्त आपल्या मातोश्रींच्या रायबरेली मतदार संघावरच लक्ष केंद्रीत केले होते. आता त्यांना अधिकृतपणे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस करण्यात आल्याने त्यांना आता अधिकृतपणे पक्षाच्या कारभारात लक्ष घालणे शक्‍य होणार आहे. पक्षाने सुरूवातीच्या टप्प्यात त्यांच्यावर पुर्व उत्तरप्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली असून ज्योतिरादित्य शिंदे यांना पश्‍चिमी उत्तरप्रदेशचे प्रभारी करण्यात आले आहे.

प्रियांका आता रायबरेलीच्या जागेवर सोनिया गांधी यांच्या ऐवजी निवडणूक लढवणार असल्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. त्यांच्या अधिकृत राजकारण प्रवेशाने उत्तरप्रदेशचे राजकीय समिकरणही आता बदलण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 47 वर्षीय प्रियांका यांच्या व्यक्तीमत्वावर त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांची छाप असल्याचे आणि त्यांची स्वभाव शैलीही इंदिराजींसारखीच असल्याची चर्चा या आधी अनेक वेळा झाली आहे. त्यातूनच त्यांनी अधिकृतपणे राजकारणात प्रवेश करावा अशी मागणी अनेक वेळा झाली होती पण प्रियांकांनी स्वत:ला जाणिवपुर्वक राजकारणापासून दूर ठेवले होते. पण लोकसभा निवडणुकीचा मुहुर्त साधून त्यांनी राजकारण प्रवेशाची अचुक वेळ साधली असली तरी त्यांना उत्तरप्रदेशाच्या कठीण राजकीय स्थितीचा सामना करावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)