करतरपूर साहिब भारतात नसल्याला कॉंग्रेस सरकार जबाबदार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: देशाच्या फाळणीच्यावेळी करतारपूर साहिबचा भारतामध्ये समावेश न होण्यास पूर्वीच्या कॉंग्रेस सरकारची अक्षमताच कारणीभूत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. शिखांचे 10 वे गुरु गोविंद सिंग यांच्या 350 व्या जयंतीच्या निमित्ताने विशेष नाण्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आता भारतातील भाविकांना पाकिस्तानमधील करतारपूर साहिबकडे दुर्बिणीतून बघायला लागत नाही. तर करतारपूर साहिब कोरिडॉरच्या माध्यमातून व्हिसाशिवाय तेथे जाणे शक्‍य होते आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले. 1984 साली तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या दंगलींच्या मुद्दयावरूनही पंतप्रधानांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली.

गुरु नानक यांची 550 वी जयंती देशभर साजरी करणार
गुरु गोविंद सिंग यांच्या 350 व्या जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधानांनी 350 रुपये किंमतीच्या एका स्मृती नाण्याचे अनावरण केले. खालसा पंथ हा योद्धयांचा पंथ आहे. या पंथाने धर्मग्रंथाचे विपुल ज्ञान दिले आहे, असे गौरवोद्‌गारही पंतप्रधानांनी काढले. गुरु नानक यांची 550 वी जयंती देशभर मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यानिमित्ताने देशातील राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि विदेशातील दूतावासांमध्येही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

1947 साली देशाच्या फाळणीच्यावेळी जर चूक झाली असेल तर कोरिडॉर हा त्या चूकीचे प्रायश्‍चित आहे. गुरु गोविंद सिंग यांच्या समाधीचे स्थळ सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर असूनही तो भाग भारतात समाविष्ट होऊ शकला नाही. हे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न या कोरिडॉरच्या माध्यमातून केला गेला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी सरन्यायाधीश जे.एस. खेहर आणि काही शिख नेतेही या प्रसंगी उपस्थित होते.
गेल्या 3 दशकांपेक्षा अधिक काळ माता, भगिनी न्यायाची प्रतिक्षा करत आहेत. गुरु नानक किंवा गुरु गोविंद सिंग यांनी न्यायाचा मार्ग दर्शवला. त्यांनी दर्शवलेल्या रस्त्यावरून मार्गक्रमण करत केंद्र सरकार 1984 सालच्या शिख विरोधी दंगलग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)