ट्विटरवर ट्रेंड होतंय #WahModijiWah

कॉंग्रेसकडून मोदीसरकारवर हल्लाबोल!

नवी दिल्ली: स्विस बँकेतील भारतीयांच्या ठेवींमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी वाढ झाल्याचा अहवाल आल्यापासून मोदी सरकारवर विरोधकांकडून हल्लाबोल करण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्विस नॅशनल बँकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये भारतीयांच्या स्विस बँकेतील ठेवींमध्ये 50 टक्के वाढ होऊन ठेवींचा आकडा 7 हजार कोटींवर पोहोचल्याचे नमूद केले होते.

काँग्रेसने परदेशात असलेल्या काळ्या पैशात झालेल्या वाढीवरून मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधीसह अनेक नेत्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

मोदींनी 100 दिवसांत 80 लाख कोटीं रुपये एवढा काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात स्विस बँकेतील काळा पैसा 50 टक्क्यांनी वाढून 7 हजार कोटींवर पोहोलचला आहे, अशी टीका काँग्रेसकडून होत आहे.

दरम्यान, ट्विटरवर #WahModijiWah ट्रेंड होत आहे. कॉंग्रेसच्या अधिकृत अकाउंटवर  “मोदी सरकार 2014 पासून काळा पैसा परत आणण्याबाबत दावे करत आहे आणि त्याचप्रकारे निधीचे समर्थनही केले आहे. हा जुमला आता 201 9 पर्यंत ढकलण्यात येईल” असे ट्विट केले आहे. तसेच प्रधान मंत्री आहेत का प्रचार मंत्री? असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला आहे.

सबंधित वृत्त 

राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर उपहासात्मक टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)