प्रियंका चतुर्वेदीचा अखेर काँग्रेसला राम राम

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्‍त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी राजीनामा दिला आहे. वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला आहे. तसेच त्यांनी  ट्विटर प्रोफाइलमधून ‘कॉंग्रेस राष्ट्रीय प्रवक्‍त्या’ असल्याची माहिती काढली आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. तसेच राजकीय वर्तुळात प्रियंका चतुर्वेदी या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

तत्पूर्वी, प्रियंका चतुर्वेदी यांनी महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या गुंडांना पक्षात प्राधान्य दिलं जात असल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली होती. याबद्दल त्यांनी एक ट्विट केलं होते की, ‘काही माणसं मेहनत करुन पक्षात आपलं स्थान निर्माण करतात. मात्र त्यांच्याऐवजी महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या मंडळींना पक्षात प्राधान्य दिलं जातं, ‘मी पक्षासाठी टीकेचा सामना केला. दगड झेलले. मात्र तरीही उलट पक्षाच्या नेत्यांनीच मला धमक्या दिल्या. जे लोक धमक्या देत होते, ते वाचले. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ही बाब अतिशय दुर्दैवी आहे,’ अशा शब्दांमध्ये चतुर्वेदी यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)