कॉंग्रेस प्रगतीच्या वाटचालीतील अडसर दूर ; विखेंचे नाव न घेता थोरातांचा टोला

जागा मोकळ्या झाल्याने कॉंग्रेसकडे येणाऱ्याचा ओघ वाढला

नगर: जेथे बोलायचे तेथे बोलले जाणार आहे. आज दारूगोळा बाहेर काढला नाही. तो साठवून ठेवला असून येत्या महिन्याभरात योग्य ठिकाणी तो वापरला जाईल. आज कॉंग्रेसच्या मेळाव्याला झालेली गर्दी पाहता जिल्ह्यात कॉंग्रेस प्रगतीच्या वाटचालीतील अडचण दूर झाल्याचे दिसते. त्यामुळे तरूणांचा कॉंग्रेसकडे येण्याचा ओघ वाढला असल्याचा टोला माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता लगावला.

ना. विखे यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच विखेंचा पत्ता कट करून जिल्हा कॉंग्रेसची कार्यकर्त बैठक येथील तूषार गार्डन येथे आज झाली. त्यावेळी आ. थोरात समर्थकांनी जोरदार शक्‍तीप्रदर्शन केले. छोट्या कार्यकर्त्यांनी या बैठकीत थेट ना. विखेंवर आरोप केले. पण मोठ्या नेत्यांनी संयम ठेवून वरवर नाव न घेता टिका केली. आ. थोरात म्हणाले की, गेल्या आठ ते दहा दिवसात जिल्ह्यात कॉंग्रेसमध्ये वातावरण बदलले. जिल्हाभरातून नेते व कार्यकर्त्यांचे फोन आले. कॉंग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसत आहे. आजच्या मेळाव्याला देखील गर्दी पाहिल्यानंतर कोठे तरी गुंतले होते. ते आता मोकळे झाल्याने कॉंग्रेस प्रगती होणार हे दिसू लागले आहे.जागा मोकळी झाली अजूनही अनेक जागा मोकळ्या होणार आहेत. त्यामुळे नव्याने येणाऱ्यांना संधी मिळणार आहे. मी जिल्हाध्यक्षच पण भाजपचा प्रचार करणार, झाली जागा मोकळी तेथे जिल्हाध्यक्ष म्हणून करण ससाणे यांची नियुक्‍ती झाली. यापुढे अनेक जागा मोकळ्या होणार असून तेथे पक्षाचे काम करणाऱ्यांना संधी दिली जाईल.

कॉंग्रेस अनेक वेळा संकटात सापडली. पण त्यावर मात करून ती पुढे वाढतच गेली. आताही पाच वर्ष संकटात गेली आहेत. पण आता कॉंग्रेस काय आहे हे लोकांना समजले. त्यामुळे लोक कॉंग्रेसबरोबर येत आहे. त्यामुळे कॉंग्रेस सोडून गेलेले फसले, शंभर टक्‍के ते फसले आहेत. सत्ता म्हणजे सर्व काही नसते. विचार व ध्येयधोरण देखील महत्वाची असतात. त्यामुळे विचारांचा विजय होईल असे आ. थोरात म्हणाले.

यावेळी आ. शरद रणपिसे, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. भाऊसाहेब कांबळे, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हाध्यक्ष करण ससाणे, विनायक देशमुख यांची भाषणे झाली.

2009 मध्ये लोणीवरून भाजपच्या मदतीचे आदेश

2009 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार शिवाजी कर्डिले होते. कर्जतमध्ये कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्ते आघाडीच्या उमेदवाराचे काम करीत असतांना शेवटचे चार दिवस राहिले असतांना लोणीवरून निरोप आला. आघाडी नाही तर भाजपच्या दिलीप गांधी यांचे काम करण्याचे आदेश आले. त्यामुळे त्यांना पक्षाचे काही देणे-घेणे नाही असा आरोप तालुकाध्यक्ष बाळासाहेब सांळूखे यांनी केला.

आ.थोरात भावी मुख्यमंत्री

या बैठकीत कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याने बसण्यासाठी जागा नव्हती. “एकच साहेब बाळासाहेब’, “कोण आला रे कोण आला संगमनेरचा वाघ आला’, अशा घोषणा सुरू असतांना राहाता महिला तालुकाध्यक्ष लता डांगे यांनी भाषणात आ. थोरात यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्यानंतर एकच जल्लोष झाला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)