छत्तीसगडच्या मुख्यंमत्रीपदी ‘भूपेश बघेल’ यांची वर्णी    

नवी दिल्ली – छत्तीसगडचा मुख्यंमत्री कोण होणार ? या गेल्या अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चेला काॅंग्रेसने आज अखेर पूर्णविराम दिला आहे. काॅंग्रेसने आज छत्तीसगड काॅंग्रेसचे अध्यक्ष असलेले भूपेश बघेल यांच्या नावाची छत्तीसगडच्या  मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा केली आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी बघेल यांच्याबरोबरच टीएस सिंहदेव, ताम्रध्वज साहू आणि चरणदास अनंत यांची देखील नावे चर्चेत होती. मात्र अखेर भूपेश बघेल यांनी बाजी मारली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काॅंग्रेसने छत्तीसगड विधानसभा निवडणूकीत 90 पैकी 68 जागांवर विजय मिळवला असून, गेली 15 वर्ष सत्ते असलेल्या भाजपाला केवळ 15 जागांवर समाधान मानावे लागले आहे. छत्तीसगडमधील काॅंग्रेसच्या विजयात भूपेश बघेल यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले जाते. ओबीसी नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे.

भूपेश बघेल यांचा जन्म मध्यप्रदेशमध्ये (आता छत्तीसगड) 23 आॅगस्ट 1961 ला एका शेतकरी कुटूंबात झाला. 1980 पासून ते काॅंग्रेस पक्षाशी जोडलेले आहेत. 2014 पासून त्यांच्याकडे छत्तीसगड काॅंग्रेसचे अध्यक्षपद आहे. मध्य प्रदेशातील तत्कालिन दिग्विजय सिंह सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्रीदेखील होते. 2000 मध्येही जोगी सरकारमध्येही त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद होते.

सोमवारी संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास बघेल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती मिळत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)