चौकीदार सेल्समन झाल्याची कॉंग्रेसची टीका

नवी दिल्ली -जनतेशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या नमो ऍप आणि वेबसाइटवरून आता नमो अगेन असे घोषवाक्‍य प्रिंट केलेले टी-शर्ट, पेन, डायरी, स्टिकर्स अशा अनेक प्रकारच्या साहित्यांची विक्री सुरू झाली आहे. त्यावर ट्‌विटरवरून टीकेचा सूर उमटू लागला आहे.

हे साहित्य विक्री करण्यासाठी नरेंद्रमोदीडॉटइन या वेबसाइटवर एक वेबपेज तयार करण्यात आले आहे. त्यावर ऑनलाइन विक्री करणाऱ्या कंपन्यांप्रमाणेच वस्तूंची विक्री केली जात आहे. या साहित्यांची खरेदी करून आणि नमो अगेन असे टी-शर्ट घालून 31 मार्चच्या मैं भी चौकीदार कार्यक्रमास आल्यास मला आनंद होईल. तुम्ही हे ऑर्डर केलेय ना! असे ट्‌विटही नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी केले होते.

त्यावर कॉंग्रेसच्या प्रवक्‍त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी चौकीदार जी सेल्समन है असे ट्‌विट केले होते. त्यानंतर त्यांनी आणखी एक ट्‌विट करून चौकीदार दुकानदार है, अशी कोपरखळीही मारली. या वस्तूंच्या मार्केटिंगसाठी नमो मर्चेंडाइज नावाचे ट्‌विटर हॅंडल सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात आले. त्याला खुद्द मोदीही फॉलो करतात. टी-शर्ट, मोदी जॅकेट, हुडीज, बॅजेस, व्रिस्टबॅंड, नोटबुक, स्टिकर्स, मॅग्नेटिक स्टिकर्स, कप, टोप्या, पेन, मोदींची पुस्तके, की-चेन्स, मास्क, भिंतीवरील घड्याळे विक्रीला आहेत. विशेष म्हणजे या सर्व वस्तूंवर भाजपाचे चिन्ह व नमो अगेन असे प्रिंट केलेले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here