निधी न मिळाल्याने कॉंग्रेस नगरसेविकेची गांधीगिरी

File photo

सोलापूर, (प्रतिनिधी) – “भीक द्या.. भीक द्या’ प्रभाग विकासासाठी भीक द्या अशी मागणी करत नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी मंगळवारी महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत गांधीगिरी करत लक्ष वेधून घेतले. फाटकी साडी आणि हातात टोपली अशा अवतारात त्यांनी सभागृहात प्रवेश करीत थेट महापौरांसमोर जाऊन भीक मागण्यास सुरवात केली. अचानकपणे झालेल्या या प्रकारामुळे सभागृहात एकच गदारोळ झाला.

निधी न मिळाल्याच्या कारणावरून गेल्या महिन्यात झालेल्या सभेवेळी फुलारे यांनी महापालिकेच्या सभागृहाला कुलुप ठोकले होते. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही नोंद झाला असून, कांग्रेसने त्यांना नोटीसही बजावली होती. मात्र नोटीसीला उत्तर देण्याएवजी त्यांनी कांग्रेसचा राजीनामा देत सर्वांनाच धक्का दिला होता. “मला जनतेने निवडून दिले आहे, त्यामुळे जनतेसाठी कितीही आंदोलन करावी लागली तरी ती करणारच.’ अशी त्यांची भूमिका आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या दोन वर्षांपासून प्रभाग विकासासाठी कसलाही निधी मिळाला नाही. त्यामुळे प्रभागात काहीच कामे करता आली नाहीत. निवडून दिलेल्या मतदारांच्या रोषाला रोज सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा प्रकराची आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. याउपरही सत्ताधारी भाजपने डोळे न उघडल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा श्रीदेवी फुलारे यांनी यावेळी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)