लातूरमध्ये कॉंग्रेस नगरसेवकाला खंडणीप्रकरणी अटक

लातूर: लातूरमध्ये जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याप्रकरणी कॉंग्रेसच्या नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. याबाबत एका खासगी क्‍लासच्या संचालकांनी तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे लातूरमधील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सचिन मस्के असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लातूरमधील शिक्षणाचा पॅटर्न देशभर प्रसिद्ध आहे. या ठिकाणच्या खासगी शिकवणीतून तयार होणारे अर्थकारण कायमच गुन्हेगारीला जन्म देते. लातूर शहरातील अध्ययन कोचिंग क्‍लासचे संचालक विजयसिंह परिहार आणि राजू तिवारी यांना कॉंग्रेसचे नगरसेवक सचिन मस्के पैशांसाठी जीवे मारण्याची धमकी देत होता. यापूर्वीही त्याने त्यांच्याकडून सहा लाख रुपयेही वसूल केल्याचे परिहार आणि तिवारी यांनी तक्रारीत नमुद केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, जास्तीच्या पैशासाठी 10 डिसेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरातून अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आणि काही वेळात त्यांना सोडण्यात आले. याबाबत भयभीत झालेल्या विजयसिंह परिहार यांनी लातूर पोलिसात तक्रार दिली.

परिहार यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ सूत्रे हालवत कॉंग्रेस नगरसेवक सचिन मस्केला अटक केली. या गुन्ह्यात आणखी एक कॉंग्रेस नगरसेवक आणि जिल्हा स्तरावरील एका संघटनेचा संस्थापक अध्यक्ष असल्याची माहिती समोर येत आहे. या दोघांचा तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)