काँग्रेस भाजपात रंगला ‘हिटलर-मुसोलिनी’ सामना 

नवी दिल्ली : राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेच्या (NSSO) अधिकाऱ्यांनी दिलेल्या राजीनाम्यावरून आणि बेरोजगारीबाबत जाहीर झालेल्या आकडेवारीमधून भारतीय राजकारण भलतेच तापले असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरु आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील बेरोजगारीबाबतच्या आकडेवारीवरून भाजप सरकारवर निशाणा साधताना ट्विटरद्वारे “फुहेरेरने भारतीय जनतेला २ करोड नौकऱ्या देण्याचा वायदा केला होता मात्र रोजगारीच्या प्रागितिपत्रात तर नौकऱ्या गेल्याची आकडेवारी आली आहे. २०१८-१९ या एका वर्षात ६.५ कोटी तरुणांनी रोजगार गमावला आहे.” असे आरोप केले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राहुल गांधी यांच्या ट्विटच्या सुरुवातीला वापरण्यात आलेला शब्द ‘फुहेरेर’ हे हिटलरचेच एक नाव असून मोठी-मोठी आश्वासने देण्याची सवय असल्याने हिटलरला हे नाव देण्यात आले होते.

राहुल गांधी यांच्या या ट्विटचा भाजपकडून देखील खरपूस समाचार घेण्यात आला असून भाजपकडून राहुल गांधी यांची तुलना मुसोलिनी या हुकूमशाहशी करण्यात आली आहे.

“ज्या व्यक्तीने आपल्या संपूर्ण आयुष्यात कधी नौकरीच केली नाही अशा व्यक्तीला नौकरी बाबत काय समजणार? ‘ईपीएफओ’ची खरी माहिती तपासल्यावर नौकऱ्यांमध्ये झालेली वाढ समजेल. राहुल गांधी यांच्यामध्ये मुळात समजच कमी आहे. त्यांच्यामध्ये इटलीचा हुकूमशहा मुसोलिनी सारखे लघुदृष्टीचे गुण उपजतच आल्याचे दिसते.” असं ट्विट भाजपकडून करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)