कॉंग्रेस-भाजप मिळून सुद्धा मला हैद्राबादमध्ये हरवू शकत नाही- ओवेसी

संग्रहित छायाचित्र..
नवी दिल्ली:एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपबरोबर कॉंग्रेसवर सुद्धा निशाणा साधला आहे. हैद्राबादमध्ये माझ्या विरोधात जिंकून दाखवा, असे आवाहन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांना दिले आहे.
ओवेसी म्हणाले, “मी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना माझ्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी आवाहन देतो. तसेच मि कॉंग्रेसला सुद्धा आवाहन देतो. कारण हे दोन्ही पक्ष एकत्र आले तरीदेखील मला हरवू शकत नाहीत”. असे त्यांनी स्पष्ट केले.
ओवेसी भाजप आणि कॉंग्रेसवर हल्लाबोल करत आहेत. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला गेले होते. तेव्हा सुद्धा त्यांनी कॉंग्रेसवर टीका केली होती.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)