उत्तर प्रदेशातील सर्व जागा लढविण्याचा काँग्रेसचा निर्णय

लखनऊ – उत्तरप्रदेशात आत्तापर्यंत एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी या पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याची घोषणा केली आहे. दोन्ही पक्ष 50-50 टक्के जागा लढवणार आहे. त्यानंतर आता काँग्रेसने एकट्यानेच सर्वच्या सर्व म्हणजेच 80 जागेवर निवडणुक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान युतीसाठी क्राँग्रेसचे दरवाजे अजूनही खुले आहेत, युती करायची असेल तर त्यांना समाविष्ट केल जाईल, अस काँग्रेसने म्हटल आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

युपी काँग्रेसचे प्रभारी गुलाम नबी आझाद आणि यूपी कांग्रेस अध्यक्ष राज बब्बर यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, काँग्रेस पक्ष भाजपाविरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निवडणुक लढविणार आणि या लढाईत जो पण पक्ष येऊ इच्छितो, त्याच काँग्रेस पक्षातर्फे स्वागतच आहे. आमच्यासोबत या लढाईत जो पक्ष पुढे येईल, त्या पक्षाचं आम्ही सन्मानच करू, असं त्यांनी म्हटलं.

पुढे बोलताना आझाद म्हटले की, आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीत यूपीमध्ये सर्व 80 लोकसभा जागेवर लढणार आहोत. आम्ही पूर्णपणे तयार आहोत. 2009 लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे काँग्रेस यूपीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला होता, त्याप्रमाणे यावेळी आम्ही एकटे निवडणुक लढणार आणि 2009 निवडणूकीतील विजयी जागेच्या दुप्पट जागा जिंकणार, असं आझाद यांनी म्हटल आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)