झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडांचा कॉग्रेस प्रवेश 

चाईबासा – झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांनी आज कॉग्रेस पक्षात प्रवेश केला. चाईबासा येथे कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष डॉ. अजय कुमार यांच्या उपस्थितीत मधु कोडा यांनी कॉंग्रेस पक्षाचे सदस्यत्त्व स्वीकारले. मधु कोडा यांच्याबरोबरच त्यांची पत्नी आणि आमदार गीता कोडा यांनीही कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

काही दिवसांपूर्वी गीता कोडा यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीमध्ये भेट घेतली होती, तेव्हापासूनच गीता कोडा आणि मधु कोडा यांच्या कॉंग्रेस प्रवेशाचे अंदाज व्यक्त केले जात होते. मधु कोडा आणि गीता कोडा याच्या प्रवेशाचा सन 2019च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला फायदा होण्याची अपेक्षा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)