मध्यप्रदेशात कॉंग्रेसने स्वीकारले सौम्य हिंदुत्व

भोपाळ – मध्यप्रदेशातील विधानसभेच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर कॉंग्रेसने आज आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला. राम, नर्मदा नदी आणि गोमूत्राचा यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे कॉंग्रेसने सौम्य हिंदुत्व स्वीकारल्याचे निरीक्षण व्यक्‍त होत आहे.

“वचन पत्र’ या नावाचा हा जाहीरनामा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ, निवडणूक प्रचार प्रमुख ज्योतिरादित्य सिंदीया आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला. मध्यप्रदेशात स्वतंत्र अध्यात्मिक विभाग सुरू करण्यात येईल.

-Ads-

संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्यात येईल, असे आश्‍वासन यामध्ये देण्यात आले आहे. भगवान रामाने 14 वर्षांच्या वनवासाच्या काळात ज्या मार्गावरून प्रवास केला होता, तो”राम पथ’ विकसित केला जाईल, गोमूत्र आणि गायीच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्यांचे व्यवसायिक उत्पादन केले जाईल, असे आश्‍वासनही या जाहिरनाम्यामध्ये देण्यात आले आहे. त्याशिवाय नर्मदा नदीचे संवर्धन केले जाईल. तालुका पातळीवर गोशाळा उभारणे आणि जखमी गायींवरील उपचाराची व्यवस्था केली जाईल, असेही त्यात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)