खूप शुभेच्छा माझ्या मित्रा!, इस्रायलच्या पंतप्रधानकडून मोदींचे अभिनंदन!

नवी दिल्ली: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे. जगभरातून मोदींवर कौतुकाचा वर्षाव होत असून भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापनेसाठी तयार आहे. २०१४ मध्ये भाजपने बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली होती. आता पुन्हा भाजपने ३०० पेक्षा जास्त लीड घेत ऐतिहासिक मुसंडी मारली आहे.

बेंजामिन नेतान्याहू म्हणाले, “माझे मित्र नरेंद्र मोदी यांना प्रभावशाली निवडणुकीत विजय मिळाल्याबद्दल शुभेच्छा! हे निवडणुकांचे निकाल पाहता पुन्हा एकदा जगातील सर्वात मोट्या लोकशाही देशामध्ये आपले नेतृत्व गुण स्पष्ट होत आहेत. आपण भारत आणि इझराईल मधील घनिष्ट मैत्रीला मजबूत करू, खूप शुभेच्छा माझ्या मित्रा”

https://twitter.com/netanyahu/status/1131479880934334465

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)