नवी दिल्ली: भाजप ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे. संपूर्ण देशात मोदी लाट उसळली आहे. दरम्यान, “लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व विजय मिळाल्याबद्दल नरेंद्र मोदींचं अभिनंदन करतो. अमित शहा आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावली” अशी प्रतिक्रिया लालकृष्ण आडवानी यांनी दिली आहे.
देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहे. देशभरातील सर्वच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू असून, लोकसभा मतदारसंघातील सुरुवातीचे कल सेना-भाजपच्या दिशेने असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या लाटेची जादू सर्वत्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील पक्षाला मिळालेल्या या यशा बद्दल सोशल मीडियावर ट्विट टाकले आहे. यामध्ये मोदींनी “सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत” असं म्हंटल आहे.