अबुधाबीच्या युवराजांकडून मोदींचे अभिनंदन !

नवी दिल्ली: भाजपची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल असून एनडीए ३५० च्या पल्याड तर एकट्या भाजपचे ३००हून अधिक उमेदवार आघाडीवर आघाडीवर आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अबुधाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन सय्यद यांनी मोदींचे लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.

देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहे. देशातील सर्वच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू असून, लोकसभा मतदारसंघातील सुरुवातीचे कल सेना-भाजपच्या दिशेने असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या लाटेची जादू सर्वत्र पाहायला मिळत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here