प्रथम रक्‍ताळले नंतर चहा पिताना दिसले अभिनंदन… 

भारतीय वैमानिकाचे दोन व्हिडीओ 

नवी दिल्ली – पाकिस्तानी सैन्याकडून कथितपणे पकडण्यात आलेल्या भारतीय वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे दोन व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या व्हिडीओमध्ये अभिनंदन वर्धमान हे रक्‍ताळलेले आणि डोळे बांधलेल्या अवस्थेत दिसत आहेत. मात्र स्थिरचित्त आणि वेदना सहन करत ते विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देताना दिसत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकिस्तानी लढाऊ विमानांचा हल्ला परतवण्याच्या प्रयत्नात असताना विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे “मिग-21′ बिसन हे लढाऊ विमान पाकिस्तानी माऱ्यामुळे कोसळले. विमानातून सुखरूपपणे बाहेर पडलेले अभिनंदन हे नियंत्रण रेषेपलिकडे पडल्यामुळे त्यांना पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतले आहे.

विंग कमांडर अभिनंदन यांचे आणखीही काही व्हिडीओ सोशल मिडीयावर पसरले आहेत. यापैकी एका व्हिडीओमध्ये त्यांना जमावाकडून मारहाण होताना आणि नंतर त्यांना काही सैनिक घेऊन जाताना दिसत आहे. मात्र या व्हिडीओची सत्यता पडताळली जाऊ शकली नाही. नंतर पाकिस्तानने आणखी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. त्यात गालावरून रक्‍त वहात असलेली आणि डोळे बांधलेली व्यक्‍ती आपण “विंग कमांडर अभिनंदन’ असल्याचे सांगताना दिसते. त्यांनी केवळ स्वतःची ओळख, आयडी क्रमांक आणि विवाहाव्यतिरिक्‍त अन्य प्रश्‍नांची उत्तरे देण्यास नकार दिला.

मात्र युद्धबंद्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचे उघडपणे न दर्शवण्याच्या जिनिव्हा करारातील मुद्दा लक्षात घेऊन हा व्हिडीओ ट्विटरवरून लवकरच हटवण्यात आला. काही तासातच 1 मिनिट 19 सेकंदांचा दुसरा व्हिडीओ प्रसिद्ध केला गेला. त्यात अभिनंद हे चहा पिताना दिसत आहेत. मात्र त्यांचे डोळे सुजलेले आणि चेहरा खरचटलेला दिसले. याही वेळी त्यांनी निर्भयपणे प्रश्‍नांना उत्तरे दिली. “आपण कोणताही तपशील सांगू शकत नाही.’ असेच उत्तर त्यांनी बहुतेक प्रश्‍नांना दिले. त्यावर “तुम्हाला चहा आवडला असेल.’ असे प्रश्‍नकर्त्या पाक अधिकाऱ्याने विचारले. त्यावर “अप्रतिम’ असे उत्तर अभिनंदन यांनी दिल्याचे दिसते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)