प्रियंकांनी वाराणसीतून मोदींविरोधात निवडणूक लढवावी : काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी    

वाराणसी : काँग्रेसतर्फे काल प्रियंका गांधी यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड करण्यात आल्यापासून भारताच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये चोहीकडे प्रियंका गांधी यांच्याच नावाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. अनेक राजकीय जाणकारांनी देखील प्रियंका यांचा सक्रिय राष्ट्रीय राजकारणातील प्रवेश काँग्रेससाठी लाभदायक ठरणार असल्याचे भाकीत केले आहे.

दरम्यान प्रियंका यांच्या प्रवेशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास देखील चांगलाच वाढला असून वाराणसी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून प्रियंका गांधी-वढेरा यांनी आगामी लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघातून लढवावी अशी मागणी करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नुकताच राष्ट्रीय राजकारणामध्ये औपचारिक प्रवेश केलेल्या प्रियंका यांच्यासमोर वाराणसी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पोस्टर्स द्वारे ही मागणी करण्यात आली आहे. या पोस्टर्सवर प्रियांका गांधी व राहुल गांधी यांच्या छायाचित्रांसमवेत “काशी की जनता करे पुकार, प्रियंका गांधी हो सांसद हमार.” असा संदेश देखील छापण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)