युतीमध्ये पुन्हा वादाची ठिणगी

मुंबई – शिवसेना आणि भाजप युतीमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.कारण युवासेना आणि उत्तर मध्य मुंबईच्या भाजप उमेदवार पूनम महाजन यांच्यात वाद सुरु आहे. पूनम महाजन यांच्या बॅनरवर आदित्य ठाकरे यांचा फोटो नसल्याने युवासेना नाराज आहे.

आदित्य ठाकरे हे देशाचे युथ आयकॉन आहेत. त्यांचा अपमान हा आम्हा शिवसैनिकांचा अपमान आहे. उत्तर-मध्य मुंबईच्या उमेदवार पूनम महाजन यांच्या बॅनरवर आदित्य ठाकरे यांना डावलले जात आहे. या वृत्तीचा जाहीर निषेध करत आहे. त्यामुळे पूनम महाजन चूक मान्य करेपर्यंत भाजपच्या प्रचारावर बहिष्कार टाकत आहोत. युवासैनिक पूनम महाजन यांच्या कुठलीही सभा आणि प्रचाराला उपस्थित राहणार नाहीत, अशी भूमिका युवासेनेने घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)