निवडणूक जिंकूनही अनामत रक्कम जप्त!

शीर्षक वाचून आश्‍चर्य वाटलं असेल ना? हे कसं शक्‍य आहे, असा प्रश्‍नही पडला असेल ना? पण हे घडलेलं आहे. उत्तर प्रदेशातील ज्या आजमगढ या लोकसभा मतदारसंघात समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव सध्या भाजपाचे “बाहुबली’ रमाकांत यादव यांच्याशी दोन हात करत आहेत. त्याच लोकसभा मतदारसंघातील सगडी विधानसभेच्या निवडणुकीत हा प्रकार घडला होता.

1952 मध्ये म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत येथे 13 उमेदवारांमध्ये एकूण मतांचे अत्यंत व्यापक विभाजन झाले होते. या विधानसभा मतदारसंघामधील एकूण 83378 मतदारांपैकी 32378 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार बलदेव ऊर्फ सत्यानंद यांनी 4969 मते मिळवत आपले प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार शंभू नारायण यांना 621 मतांनी पराभूत केले होते. बलदेव हे विजयी झाले असले तरी त्यांची अनामत रक्‍कम जप्त झाली. खरे तर या निवडणुकांमुळे आणि या निकालामुळे पहिल्यांदाच लोकप्रतिनिधी कायद्यातील सर्वांत मोठी विसंगती समोर आली. ती म्हणजे उमेदवारांना अनामत रक्‍कम वाचवण्यासाठी एकूण वैध मतांपैकी एक षष्ठांश मते मिळवणे आवश्‍यक आहे; परंतु निवडणूक जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा अधिक मते मिळवणे आवश्‍यक आहेत. ही मते एक षष्ठांशपेक्षा कमी असली तरीही कायद्याने ही निवड वैधच मानली जाते. अशा वेळी सदर विजयी झालेला उमेदवार मतदारसंघातील एकूण जनतेपैकी किती लोकांचे प्रतिनिधीत्त्व करणारा असेल याचा विचार करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)