देशातील व्यापाऱ्यांकडूनही होऊ लागली कर्जमाफीची मागणी?

नवी दिल्ली – शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीप्रमाणेच आपल्यालाही कर्जमाफी मिळावी, अशी मागणी देशातील व्यापाऱ्यांनी करायला सुरुवात केली आहे. उद्योग व शेतकऱ्यांना ज्या प्रमाणे कर्जमाफी मिळते त्या प्रमाणे व्यापाऱ्यांनाही मिळायला हवी, असे व्यापाऱ्यांच्या संघटनेचे म्हणणे आहे.

आधी कॉर्पोरेट सेक्‍टर आणि मोठ्या उद्योगांचे कर्ज माफ करण्यात आले आणि आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येत आहे. हा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक धक्‍का आहे आणि कोट्यवधी करदात्यांशी केलेला विश्वासघात आहे. मात्र देशातील सात कोटी व्यापाऱ्यांपैकी ज्यांनी कर्ज घेतले आहे त्यांचे कर्जही माफ व्हायला हवे, असे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या व्यापाऱ्यांच्या संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कर्जमाफी हा राजकीय पक्षांच्या दृष्टीने मतांचा व्यापार आहे. आपल्या मनाप्रमाणे देशाच्या तिजोरीतून अशा प्रकारे कर्ज माफ करून बॅंकांवर त्याचे ओझे टाकण्याचा आणि बॅंकिंग व्यवस्था उद्धस्त करण्याचा अधिकार राज्यघटनेत कोणत्याही सरकारला दिलेला नाही, असे कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी म्हटले आहे. कॅटने या मुद्यावरून मोठे राष्ट्रीय आंदोलन सुरू करण्याचा इशाराही दिला आङे. यासाठी 12-13 जानेवारी 2019 रोजी भोपाळ येथे राष्ट्रीय गव्हर्निंग काऊंसिलची बैठक बोलावण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)