द्रमुककडून तामिळनाडु सरकारचे कौतुक 

चेन्नाई – तामिळनाडुत आलेल्या गाजा चक्रीवादळातील आपदग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने जे प्रयत्न केले आहेत त्याचे द्रमुक पक्षाचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी ट्‌विटरवर कौतुक केले आहे. त्यांनी खुल्या दिलाने सरकारच्या कामाचे कौतुक केल्याने त्यांच्या या भूमिकेचे स्वागत होत आहे. ज्या पद्धतीने सरकारी यंत्रणांनी या आव्हानाचा मुकाबला करण्याचा प्रयत्न केला आहे ते कौतुकास्पद आहे असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.

या आपत्तीच्या निवारणासाठी सर्वांनीच सहकार्य करण्याचे आवाहन अद्रमुक सरकारने केले होते. त्यानुसार स्टॅलिन यांनी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांनाही आपदग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकारच्या यंत्रणांनी मदत सामग्री पोहोचवण्याचे काम अधिक वेगाने करावे अशी अपेक्षाही त्यांनी आपल्या संदेशात व्यक्त केली आहे.

-Ads-

सन 2015 साली आलेल्या पुराच्या आपत्तीतील निष्काळजीपणाबद्दल द्रमुक पक्षाने राज्य सरकारवर कडाडून टीका केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी सरकारच्या कामाचे कौतुक केल्याने लोकांमध्ये कुतुहल निर्माण झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)