सीमेवर गुंतागुंतीची आव्हाने : लष्कर प्रमुख

नवी दिल्ली: देशाच्या सीमांवर सुरक्षेबाबत गुंतागुंतीची आव्हाने आहेत. ही आव्हाने देशाचे अखंडत्य आणि अंतर्गत स्थैर्यासाठी धोका असल्याचे लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटले आहे. नववर्षानिमित्त लष्करी अधिकाऱ्यांसाठी दिलेल्या संदेशामध्ये जनरल रावत यांनी सीमेवरील सैन्य दल आणि दहशतवादाविरोधात लढणाऱ्या सुरक्षा दलांची सामुहिक हिंमत, दृढनिश्‍चय आणि त्याग याचा गौरव केला.

सीमेवर सैन्यदलासमोर गुंतागुंतीची आणि चलनवलनविषयक आव्हाने आहेत. त्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ शकतो, असे जनरल रावत म्हणाले मात्र त्यांनी चीन किंवा जम्मू काश्‍मीरमधील प्रत्यक्ष ताबारेषेवरील स्थितीचा उल्लेख केला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सीमेवरील अतिशय विपरीत परिस्थितीमध्येही सामुहिक हिंमत, निश्‍चल, खंबीर सैन्य दलामुळे देशाचे अखंडत्व अबाधित आहे. जम्मू काश्‍मीरमध्ये प्रत्यक्ष ताबारेषेवर पाकिस्तानकडून होणारा चिथावणीखोर गोळीबार, दहशतवाद आणि घुसखोरीला लष्कराच्या सर्व श्रेणींनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. देशासमोरील आव्हानांचा सामना करताना अतिरिक्‍त उमेद दर्शवण्याची सूचना त्यांनी लष्कराला केली. लष्कर प्रमुखांनी लष्कराच्या अतुल्य योगदानाचा गौरव करताना केरळमधील पूरस्थितीच्यावेळी केलेल्या मदत कार्याचा आवर्जून उल्लेख केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)