“घाडगे आणि सून’ने नुकतेच आपले 300 भाग पूर्ण केले आहेत. आता पुढच्या भागांमध्ये आणखी काही नाट्यमय घडामोडी दिसण्याची शक्यता आहे. सिरीयलची मुख्य नायिका असलेल्या भाग्यश्री लिमयेने सोशल मीडियावरून या सिरीयलमधील आपले अनुभव प्रेक्षकांच्या समोर मांडले आहेत. संपूर्ण टीमबरोबरचा एक फोटो अणि मौजमजा करतानाचा एक व्हिडीओदेखील तिने अपलोड केला आहे. भाग्यश्री नुकतीच “बिग बॉस’च्या पहिल्या सीझनमध्ये येऊन गेली होती. अक्षयचे दुसरे लग्न झाले आहे. पहिली बायको अमृता माहेरी निघून गेली आहे. अक्षयची दुसरी बायको कियाराला अजूनही घरच्यांचे मन जिंकता आलेले नाही.