अमित शहांच्या विरोधात कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी तेलंगणातील जाहीर सभेत जातीय तणाव निर्माण करणारे वक्तव्य केले असून त्या प्रकरणी त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका कॉंग्रेस पक्षाच्यावतीने निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अहमद पटेल, कपिल सिब्बल, कमलनाथ यांनी निवडणूक आयोगाकडे जाऊन अनेक विषय त्यांच्याकडे उपस्थित केले. त्यात अमित शहांच्या विरोधातील तक्रार हा मुख्य विषय होता.

कपिल सिब्बल यांनी सांगितले की कॉंग्रेसच्या निवडणूक जाहींरनाम्यातील काहीं विषयांचाखोडसाळपणे वेगळा अर्थ लाऊन अमित शहा यांनी कॉंग्रेसच्या विरोधात वक्तव्ये करताना जातीय तणावही निर्माण करण्याचे काम केले आहे. या प्रकरणी त्यांना नोटीस जारी करावी अशी मागणीही कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. तेलंगणात निवडणुकीची प्रकिया सुरू असताना तेलंगणा प्रदेश कॉंग्रेस समितीचे कार्यकारी अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमाराला अटक करण्यात आली. त्यांची ही अटक बेकायदेशीर असून त्यांना का अटक केली जात आहे याची माहितीही पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेली नाही.

-Ads-

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे केवळ काळजी वाहू मुख्यमंत्री असताना ते आता तेथे मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन अधिकाऱ्यांना आदेश देत आहेत हेही बेकायदाशीर असून त्यांच्याच आदेशानुसार रेड्डी यांना अटक करण्यात आल्याचे कॉंग्रेसचे म्हणणे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)