भाजपच्या निवडणुक चिन्हा विषयी आयोगाकडे तक्रार

चिन्हाच्या खाली बीजेपी हे पक्षाचे नाव लिहीले
नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाच्या मतदार यंत्रावरील निवडणूक चिन्हाबाबत नवीन वाद निर्माण झाला आहे. मतदार यंत्रावर पक्षाचे जे चिन्ह आहे त्या खाली बीजेपी असे इंग्रजी अक्षरात लिहीलेले आढळून आले आहे. पक्षाचे ते नाव तेथून हटवावे अशी मागणी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

विरोधी पक्षाच्या नेत्यांचे एक शिष्टमंडळ आज मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटले आणि त्यांनी त्यांना या विषयी निवेदन दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की एक तर बीजेपी हे नाव तेथून काढून टाकावे किंवा अन्य पक्षांच्या निवडणूक चिन्हांच्या खाली त्यांच्या पक्षांची नावे लिहावित. या विषयी निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की भाजपचे हे अशा शैलीतील निवडणूक चिन्हा सन 2013 पासून मतदार यंत्रावर टाकले जात आहे. त्यात आता इतक्‍या ऐनवेळी बदल करणे शक्‍य नाही कारण मतदार यंत्रावरील उमेदवारांची नावे आणि त्यांची चिन्हे आता टाकून झाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)