रेल्वेच्या जेवणाबाबत ७,५०० प्रवाशांनी नोंदविल्या तक्रारी 

रेल्वेचा खुलासा  

नवी दिल्ली : यावर्षी ऑक्टोबर महिन्याअखेरपर्यंत रेल्वेमंत्रालयाकडे सात हजार पाचशेहून अधिक प्रवाशांनी रेल्वेमध्ये पुरविण्यात येणाऱ्या अन्नाबाबत तक्रारी नोंदविल्या असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाकडून आज लोकसभेमध्ये देण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे राज्य मंत्री राजेन गोहेन यांनी रेल्वे मंत्रालयाने या तक्रारींची गंभीर दाखल घेतली असल्याचे देखील सांगितले. रेल्वे मंत्रालयाने अन्न विक्रेत्यांवर ऑक्टोबर २०१८ अखेरपर्यंत १.५ कोटी रुपयांचा दंड लावला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

“अन्न सुरक्षा आणि स्वच्छताविषयक पध्दतींचे परीक्षण करण्यासाठी अन्न तयार करण्यात येणाऱ्या युनिट्समध्ये अन्न सुरक्षा पर्यवेक्षक तैनात केले गेले आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी / पर्यवेक्षकांकडून गोळा केलेले अन्न नमुने विश्लेषण आणि चाचणीसाठी अन्न सुरक्षा व मानक कायद्यांतर्गत नामांकित मान्यताप्राप्त प्रयोगशाळांना पाठवले जातात.” असं देखील त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)