आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास थेट ऑनलाईन तक्रार करा!

– मतदारांसाठी विविध डिजिटल सुविधा

मुंबई – लोकसभा निवडणूकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास नागरिकांना आता थेट ऑनलाईन तक्रार करता येणार आहे. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने ‘सी व्हिजिल’ हे नवे मोबाइल ऍप आणले आहे. या ऍपच्या माध्यमातून नागरिकांना व्हिडिओ किंवा छायाचित्र पाठवता येणार आहे. लोकसभा निवडणूक मतदानासाठी मतदारांची सुविधा आणि निवडणूक निर्भय, मुक्त, पारदर्शीपणे पार पडण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘सी व्हिजिल’ हे नवे मोबाइल ऍप उपलब्ध केले आहे. कॅमेरा, इंटरनेट कनेक्‍शन आणि जीपीएस सुविधा असलेल्या अँड्रॉइड स्मार्टफोनद्वारे या ऍपच्या माध्यमातून तक्रार करता येणार आहे.

विशेष म्हणजे तक्रारदाराला या ऍपमध्ये आपली ओळख लपवून तक्रार नोंदविण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. मतदारांना पैशांचे वाटप, मद्य, अंमली पदार्थांचे वाटप करणे, शस्त्रसाठा अथवा शस्त्रवापर, मतदारांना मारहाण, दमबाजी, चिथावणीखोर भाषण, पेड न्यूज, फेकन्यूज, मतदारांना आमिष म्हणून वस्तूंचा वापर, मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक, उमेदवाराची मालमत्ता आदी विविध प्रकारच्या तक्रारीचे छायाचित्र अथवा व्हिडिओ पुरावा म्हणून थेट अपलोड करण्याची सुविधा आहे.

आदर्श आचारसंहिता भंग होत असल्याचे वाटल्यास नागरिकाने त्या घटनेचे छायाचित्र अथवा 2 ते 3 मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा. जीपीएस प्रणालीद्वारे स्वयंचलित स्थान मॅपिंगसह फोटो अथवा व्हिडिओ या ऍपवर अपलोड करावा. त्यानंतर तक्रारदार नागरिकाच्या मोबाइलवर एक युनिक आयडी प्राप्त होईल. तक्रार अपलोड केल्यापासून साधारण दीड तासात तक्रारीची स्थिती तक्रारकर्त्याला प्राप्त होईल. त्यानंतर तक्रार योग्य असल्यास त्या तक्रारकर्त्याच्या मोबाइलवर तसा संदेश प्राप्त होईल.

याशिवाय नागरिकांनी तक्रारी नोंदविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या पूूेज://ाम्ग्‌.हग्म्‌.ग्ह या मुख्य संकेतस्थळाचा वापर करता येईल. 1800111950 तसेच 1950 या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधता येईल. दिव्यांगांची मतदारनोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हील चेअरची मागणी इत्यादी सोयी उपलब्ध करुन घेण्यासाठी पीडब्लूडी ऍप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. पीडब्लूडी आणि ‘सी व्हिजिल’ ही दोन्ही मोबाईल ऍप डाऊनलोडसाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)