स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त पोर्टल

सध्याच्या शिक्षणक्षेत्राला काही महत्त्वाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यापैकी एक कमकुवत पायाभूत सुविधा आणि दुसरे म्हणजे प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव. शिक्षणाच्या दर्जाबाबत चर्चा होत असताना त्यात व्यापक बदल होत आहेत. आजच्या घडीला शिक्षणासाठी असंख्य प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. विशेषत: तांत्रिक पातळीवर शिक्षण घेण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे. पाठपुस्तकांबरोबर तांत्रिक शिक्षणावरही भर दिला जात आहे. कारण भविष्यात सर्वकाही ऑनलाइनच्या

माध्यमातूनच ज्ञान-विज्ञानाची देवाणघेवाण होणार आहे. यादृष्टीने शैक्षणिक संस्था, विद्यापीठ ऑनलाइन कोर्सेसवर भर देताना दिसून येतात. नियमित अभ्यासक्रमाबरोबरच आयएएस, आयपीएस, एनडीए, बॅंक यासारख्या स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यासासाठी देखील ऑइलाइन मटेरियल उपयुक्त ठरत आहे. यासंदर्भात इथे माहिती देता येईल.

टेस्टबूक: टेस्टबूक डॉट कॉम हे स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करण्यासाठी उपयुक्त व्यासपीठ आहे. यात एसबीआय, आयबीपीएस पीओ, आयबीपीएस क्‍लर्क, एलआयसी आओ,गेट, एसएससी सीजीएल, कॅट यासारख्या कठीण परीक्षेची तयारी टेस्टबूक संकेतस्थळाच्या मदतीने करता येऊ लागली आहे. याठिकाणी परीक्षा संच मोफत उपलब्ध आहेत. त्यात आधुनिक प्रश्‍नांचा समावेश करण्यात आलेला आहे. टेस्टबूकच्या मते, विविध स्पर्धात्मक अभ्यासक्रमाचे सुमारे 3,752,058 संच संकेतस्थळावर आहेत.

अनऍकाडमी: शिक्षण क्षेत्रात मोफतपणे ज्ञानदान करणारे अनऍकाडमी हे भारतातील सर्वात मोठे पोर्टल होय. याठिकाणी उच्च दर्जाचे शैक्षणिक व्हिडिओ सर्वांसाठी मोफतपणे उपलब्ध आहेत. स्पर्धात्मक परीक्षेत विचारण्यात येणाऱ्या प्रत्येक मुदद्याचे विश्‍लेषण इंग्रजी, हिंदीबरोबरच प्रांतिक भाषेतही पाहवयास मिळते. याशिवाय मोबाईलवरही अनऍकडामी ऍप असून ते गुगल प्लेस्टोअरवरून मोफत डाऊनलोड करता येते.

क्‍लिअरआयएएस: क्‍लिअर आयएएस हे आयएएस तयारीसाठी उपयुक्त वेबपोर्टल ओळखले जाते. हे संकेतस्थळ मोफतपणे शैक्षणिक साहित्य, मार्गदर्शन, टॉपरच्या मुलाखती, ऑनलाइन मॉक परीक्षा यासारख्या असंख्य शैक्षणिक सुविधा संकेतस्थळावर आहेत. क्‍लिअरआयएएसचा अँड्राईड ऍप देखील आहे.

ऑनलाइन तयारी: ऑनलाईन तयारी हा आघाडीचा वेब आणि मोबाईल ऍप म्हणून ओळखला जातो. विविध स्पर्धात्मक परीक्षेची या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगली तयारी करता येते. सर्व अभ्यासक्रमाचे संदर्भ याठिकाणी पाहवयास मिळतात. या संकेतस्थळाने कोचिंग इन्स्टिट्यूट, इंडिपेंडेंट ट्यूटर्स, प्रकाशकांशी करार केले असून त्यांचे शैक्षणिक साहित्य देखील ऑनलाइन तयारीवर आहे. चालू घडामोडी आणि सामान्य विज्ञानविषयी-बाबतची अधिकाधिक अपडेट माहिती “ऑनलाईन तयारी’वर आहे.

सिव्हिल्सडेली: आयएएस आणि यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानासंदर्भात इंत्यभूत माहिती देणारे सिव्हिल्सडेली ऍप, संकेतस्थळ उपयुक्त आहे. शैक्षणिक साहित्याबरोबरच जगात घडणाऱ्या घटनांची माहिती देखील दिली जाते. देश-विदेशातील बातम्या सिव्हिल्सडेलीवर उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावर विविध विषयांवरचे डेली फ्लॅशकार्डदेखील प्रसिद्ध केले जाते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)