समाज आणि स्पर्धा

नऊ महिने नऊ दिवस आईच्या पोटात वाढून एका विशिष्ट वेळेला आपण सर्व समाजात जन्माला येतो. जन्माला आल्यावर आपल्यावर संस्कार होतात, मोठे होता होता आई शिकविते, आपले बाबा शिकवितात दादा असं करायचं, दादा तसं करायचं, कुणाचं वाईट करायचं नाही, कुणाशी भांडायचं नाही, कुणाला दुखवायचं नाही, सर्वांशी प्रेमाने सलोख्याने राहायचं, आपली मानस जपायची, नात्यात सतत गोडवा ठेवायचा असे सगळे चांगले विचार घेऊन आपण हळू-हळू मोठे होत असतो. मोठं होत असतांना आपल्याला समाजात वावरावं लागत.समाजात वावरत असतांना विविध प्रकारच्या लोकांशी आपला संपर्क येतो. अशा विविध लोकांशी संपर्क आल्यावर आपल्याला त्यांच्याकडून विविध प्रकारचे विचार ऐकायला मिळतात. हे विविध प्रकारचे विचार घेत घेत आपण या समाजात मोठे होत असतो. या सर्व प्रक्रियेमध्ये आपल्याला समाजात काय चाललंय हे कळायला थोडा उशीर लागतो.

जसं जसं आपण मोठे होऊ लागतो तसं तसं आपल्याला कळायला लागतंय कि समाजात काय चाललंय? कशा प्रकारचे लोक राहतात? कशा प्रकारच्या विचाराची लोक राहतात? कोणकोणत्या जाती-धर्माची लोक राहतात? काय खातात काय पितात? त्यांचे छंद काय? कोण गरीब कोण श्रीमंत? हे सर्व हळू हळू कळायला लागतंय. याच समाजात स्पर्धा नावाची एक गोष्ट आहे, जी आजच्या काळात खूप वाढत चालली आहे. जसं जसं आपण मोठे होतो तसं तसं आपल्याला कळते कि, समाजात किती स्पर्धा चालू आहे. काही मिळवायचे असेल तर स्पर्धा, काही मोठं करायचं असेल तर स्पर्धा परीक्षेत गुण मिळवायची स्पर्धा, दुष्काळलेल्या भागात पाण्यासाठी स्पर्धा, निवडणुकीत जिंकण्यासाठी स्पर्धा, बाजारात आपला माल विकला जावा म्हणून विक्रेत्यांची स्पर्धा, शैक्षणिक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी स्पर्धा, भुकेलेल्या पोटासाठी स्पर्धा आणि आजच्या काळात माणसाला माणूस बनून राहण्यासाठी सुद्धा स्पर्धा करावी लागते इ. स्पर्धा समाजात उदयास आलेल्या आहेत. हे कुठे तरी थांबायला पाहिजे असं बऱ्याच वेळेस वाटत परंतु दिवसेंदिवस तंत्रज्ञान वाढून यास अजून हातभार लागत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

समाजात श्रीमंत लोकांकडे जास्त वाटा आहेत कारण त्यांच्याकडे पैसा आहे. पैसे खर्च करून ते आपले गरज भागवू शकतात परंतु माझा गरीब बांधव काय करणार? बिचारा एखादा माणूस आपल्या कष्टाने थोडी उंची गाठतो लगेच समाज, आपलीच काही माणसे, नातेवाईक, परिस्थिती त्याला तिथंपर्यंत पोहचण्याची संधी देत नाही त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. परंतु मित्रहो समाजाच्या आणि जगाच्या या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर थांबू नका. समाज काही सांगेल त्याकडे कानाडोळा करा व आपल्याला काय करायचे आहे? काय बनायचे आहे? समाज त्यांच्या वाटेवर चालला आहे. आपण आपली वाट निवडा व त्यांना दाखवून द्या कि आपल्यामध्ये काय गुण आहेत. दाखवून द्या त्यांना कि मलाही या प्रचंड स्पर्धेत लढत येते. मलाही परिस्थितीशी दोन हात करता येतात. मित्रहो सत्याचा मार्ग निवडा तो कितीही कठीण असला तरी डगमगू नका आपले प्रयत्न चालू ठेवा. शेवटी सत्याचा विजय होतो असे सांगतात आणि ते खरंच आहे. शेवटी एक दिवस नक्की आपला विजय होणार आहे. स्वतःवर अफाट आत्मविश्वास ठेवा. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही या स्पर्धेत टिकू देणार नाही आणि तुम्हाला जे करायचं आहे मिळवायचं आहे ते मिळवायला खूप कठीण जाईल.

मित्रहो स्वतःला ओळखा स्वतःची ओळख झाल्यावर कळेल आपल्यामध्ये किती शक्ती आहे ते. आपल्या ओळखलेल्या शक्तीचा वापर करा, जिद्द ठेवा, मोठे स्वप्न ठेवा, उंच भरारी घ्या, वाईट समाजाशी लढायला शिका, आपलं मत मांडायला शिका मग या स्पर्धेत आपल्याला कोण रोखू शकतंय ते बघा, एक दिवस समाज आपोआप नतमस्तक होऊन आपली हार मानेल आणि त्यावेळेस आपण या स्पर्धेत खरे विजेता ठराल. मित्रहो या समाजात मी अजून जिकंलेलो नाही कारण माझं स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाही या उक्तीप्रमाणे जो चालेल तो नक्कीच या स्पर्धेत टिकून आपले स्थान कायम ठेवेल.

– भगवान केशव गावित


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)