सीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण 

नवी दिल्ली – केंद्रीय राखीव पोलीस फोर्स (सीआरपीएफ)मध्ये डिप्टी कमांडर हिरा कुमार जुलै २०१४ मध्ये आपल्या बटालियनसोबत झारखंडमध्ये तैनात होते. त्यांना माहिती मिळाली कि, झारखंड-बिहार बॉर्डरवर नक्षलवादी दिसून आले आहेत. यानंतर हिरा कुमार नक्षलवाद्यांच्या शोधात जमुई परिसरात पोहचले. यावेळी नक्षलवादी आणि सीआरपीएफमध्ये चकमक झाली.

हिरा कुमार आणि त्यांचं बटालियनने अनेक नक्षलवाद्यांना ठार केले. सोबतच मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि स्फोटकेही जप्त केली. परंतु, या चकमकीत हिरा कुमार शहीद झाले. २०१६ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते मरणोपरांत अशोकचक्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या ऑपरेशनंतर हिरा कुमार यांच्या पत्नी बीनू झा यांच्यासाठी सरकारतर्फे अनेक घोषणा करण्यात आल्या. सरकारी नोकरी आणि जमीन देण्याचेही आश्वासन बीनू झा यांना देण्यात आले. मात्र इतकी वर्षे उलटूनही बीनू झा यांना नोकरी मिळालेली नाही. एवढेच नव्हे तर शहीद जवान हिरा कुमार यांचा विमा कंपनीनेही अद्यापही बीनू झा यांना विम्याची रक्कम दिलेली नाही.

याबद्दल विमा कंपनीला विचारले असता ते म्हणाले, डिप्टी कमांडर हिरा कुमार ज्याठिकाणी शहीद झाले. ते ठिकाण कंपनीच्या सूचीनुसार नक्षलवादी परिसरात येत नाही. त्यांच्यानुसार हिरा कुमार झारखंड राज्यामध्ये विमासाठी नाव होते. परंतु, ते बिहारमध्ये शहीद झाले आहेत, असे कारण कंपनीने दिले.

याप्रकरणी बीनू झा आणि सीआरपीएफचे अधिकारी कंपनीला पत्र लिहीत आहेत. तसेच बीनू झा यांनी अनेक नेत्यांच्याही भेटी घेतल्या. परंतु, अजूनही कोणताच निर्णय झालेला नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)