कंपन्यांचा भांडवल उभारणीचा धडाका 

37 कंपन्यांकडून आयपीओद्वारा 1.2 अब्ज डॉलरची उभारणी 
मुंबई: एप्रिल ते जून तिमाहीत 37 कंपन्यांकडून प्राथमिक भागविक्री करण्यात आली. या कंपन्यांकडून 1.2 अब्ज डॉलर्सचे भांडवल उभारण्यात आले. 2018 च्या पहिल्या सहामाहीत 4 अब्ज डॉलर्सचा निधी आयपीओच्या माध्यमातून उभारला गेला.
गेल्या तिमाहीत लघू आणि मध्यम उपक्रम क्षेत्रातील 32 कंपन्यांकडून भागविक्री करण्यात आली. त्यांनी बाजारातून 98.7 दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारला. पाच कंपन्यांनी बाजारातून 1.1 अब्ज डॉलर्सचे भांडवल गोळा केले. जानेवारी ते जून या कालावधीत हॉंगकॉंग एक्‍स्चेंजमध्ये सर्वाधिक 97 आयपीओ दाखल झाले, असून त्यानंतर भारतात 94 आणि नॅसडाकमध्ये 66 आयपीओ आले होते. गेल्या तिमाहीत आयपीओच्या संख्येत वर्षाच्या आधारे 9 टक्‍क्‍यांनी वाढ नोंदविण्यात आली असली, तर मार्च तिमाहीच्या तुलनेत यात 35 टक्‍क्‍यांनी घट झाली.
अनेक कंपन्यांकडून भांडवल उभारण्यासाठी आयपीओचा मार्ग अवलंबण्यात येत असून देशातील गुंतवणूकदारांकडून त्याला योग्य प्रतिसाद मिळत आहे. पुढील वर्षात सार्वत्रिक निवडणुका असल्याने 2018 च्या उर्वरित वर्षात येणाऱया आयपीओंवर त्यांचा परिणाम होण्याची शक्‍यता आहे.
देशात औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांकडून 12 आयपीओ आणण्यात आले असून त्यांनी 590 दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारला आहे. यानंतर मटेरियल क्षेत्रात 6 आयपीओंसह 95 दशलक्ष डॉलर्स आणि ग्राहकोपयोगी क्षेत्रातील सुटे भागाने 5 आयपीओंनी 11 दशलक्ष डॉलर्स उभारले. गुंतवणूकदारांचा विश्वास आणि देशांतर्गत भांडवलाची संख्या वाढत असल्याने आयपीओंना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
भू राजकीय स्थिती आणि लोकसभा निवडणुकीचा परिणाम 2018 च्या उर्वरित वर्षातील आयपीओवर होईल, असे ईवाय इंडियाचे संदीप खेतान यांनी म्हटले. सेबीकडून नियमावलीत सुटसुटीतपणा आणण्यात येत असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. सध्या शेअरबाजारातील तेजीचे वातावरण असल्यामुळे आगामी काळातही बऱ्याच कंपन्या बाजारात आयपीओ आणण्याची शक्‍यता
दिसत आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)