चौफेर प्रगती, सर्वांगीण सामाजिक विकासासाठी कटिबद्ध- राज्यपाल

मुंबई: अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहताना शासनाने दुष्काळनिवारणासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत, हे करताना शासन राज्याच्या चौफेर प्रगतीसाठी आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी कटिबद्ध राहून काम करत आहे, असे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी सांगितले.

विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात आज मध्यवर्ती सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली त्यावेळी ते बोलत होते.यावेळी विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळ व सत्ताधारी विधानमंडळ सदस्य उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यपालांनी अभिभाषणाच्या सुरुवातीलाच सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. दहशतवाद आणि देशविघातक कारवायांचा मुकाबला करण्यासाठी भारत सरकारला सर्वतोपरी सहाय्य करण्यास शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

राज्यपालांच्या अभिभाषणातील महत्त्वाचे मुद्दे

 • दुष्काळ निवारण आणि शेतकऱ्यांना मदत
 • थकित वीजदेयकामुळे बंद पडलेल्या पेयजल योजनांची वीज देयकांची रक्कम भरुन योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय. नोव्हेंबर 2018 ते जून 2019 या कालावधीतील पेयजल पुरवठा योजनांचे चालू वीज देयकेही भरणार.
 • राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दुष्काळग्रस्त भागामध्ये 4,400 हून अधिक चालक व वाहकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु.
 • 2,220 कोटी रुपये खर्चाच्या  जागतिक बँक सहायित “महाराष्ट्र राज्य कृषि-व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाची” अंमलबजावणी.
 • शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने “भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने” ची अंमलबजावणी
 • मलईरहित दूध भुकटी निर्यात करण्यासाठी प्रति किलो 50 रुपये इतके प्रोत्साहनपर अनुदान. दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये इतके अर्थसहाय्य. त्याकरिता एकूण 188 कोटी रुपये इतका खर्च.
 • 104 एकात्मिक बाल विकास योजना गटांमध्ये “स्वयम” प्रकल्पाची अंमलबजावणी.
 • “नील क्रांती” कार्यक्रमाअंतर्गत, 176 कोटी रुपये खर्चाचे 31 मत्स्यव्यवसाय प्रकल्प.
 • 96 कोटी रुपये खर्चातून ससून डॉकच्या आधुनिकीकरणाचे काम सुरु.
 • करंजा, जिल्हा-रायगड येथे 150 कोटी रुपये खर्चाचा मासळी उतरविण्याचा मोठा बंदर प्रकल्प. मिरकरवाडा, जिल्हा-रत्नागिरी येथे 74 कोटी रुपये खर्चाचा  मासेमारी बंदर  टप्पा-2 उभारण्याचे काम सुरु.
 • आनंदवाडी, तालुका-देवगड, जिल्हा-सिंधुदुर्ग येथे दुसरे 88 कोटी रुपये खर्चाचे मोठे मासेमारी बंदर.
 • “छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधून  सुमारे 51 लाख खातेधारक शेतकऱ्यांसाठी 24,000 कोटी रुपये मंजूर.  आतापर्यंत  43 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 18,036 कोटी रुपये इतकी रक्कम जमा.
 • 500 कोटी रुपये खर्चाची  “अटल अर्थसहाय्य योजना” सुरु.
 • किमान आधारभूत किंमत प्रापणाचा भाग म्हणून 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना 3,121 कोटी रुपये इतकी रक्कम प्रदान.
 • नोव्हेंबर 2018 ते 31 जानेवारी, 2019 या कालावधीत कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विटंल 200 रुपये इतके अर्थसहाय्य.
 • धानासाठी “विकेंद्रीकृत प्रापण योजनेअंतर्गत” धान्याची खरेदी. 1 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 486 कोटी रूपये इतकी रक्कम ऑनलाईन पद्धतीने हस्तांतरित.
 • सिंचन क्षमता आणि सुविधा वाढविल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)