बांधिलकी अमेरिकेबरोबर, चीनबरोबर नाही- सुंदर पिचई 

वॉशिंग्टन – आपली बांधिलकी अमेरिकेच्या लष्कराबरोबर आहे, चीनच्या लष्कराबरोबर नाही, अशी ग्वाही गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी दिली आहे. ट्रम्प यांनी बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये पिचई यांची भेट घेतली आणि सविस्तर चर्चाही केली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही महिन्यांपूर्वी काही बड्या कंपन्यांवर टीका केली होती. गुगल अमेरिकेच्या हितात काम करत नसल्याची टीका ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. या पार्श्‍वभुमीवर पिचई आणि ट्रम्प यांची भेट झाली होती. आपली बांधिलकी चीनबरोबर नसून अमेरिकेबरोबर असल्याचे पिचई यांनी स्पष्ट केले असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. पिचई यांच्याकडून मात्र या भेटीविषयी कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही. मात्र ट्रम्प यांच्याबरोबरची भेट खूपच समाधानकारक झाली असल्याचे गुगलच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)