कमिशनखोर, दलालीखोरांना देशाची चिंता नाही : नरेंद्र मोदी

चौकीदाराला कितीही घाबरविले तरी साफसफाई करणारच

सोलापूर: जनतेच्या विकासाऐवजी केवळ राजनीतीतच गुरफटलेल्या कमिशनखोर आणि दलालीखोर विरोधकांना देशाची चिंता नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस पक्षाचे नाव न घेता केली. चौकीदाराला कितीही घाबरवण्याचा प्रयत्न करा, साफसफाई करणारच असे ठासून सांगत त्यांनी कॉंग्रेस पक्षाला खुले आव्हान दिले.

मिशेलमामांच्या संबंधाबाबत कॉंग्रेसने स्पष्टीकरण द्यावे
राफेल करारावरून मोदींवर कॉंग्रेसकडून चौफेर हल्ला होत आहे. या आरोपांना मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिले. दलाल मिशेलवरून त्यांनी कॉंग्रेसवर थेट हल्लाबोल केला. मिशेल मामाचा काय संबंध आहे, हे कॉंग्रेसने स्पष्ट करावे, अशी मागणी मोदी यांनी केली. मोदी सरकार करत असलेल्या कामाची जगभरातून दखल घेतली जात असताना काही लोकांना ते रुचत नाही, अशी खोचक टीका त्यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोलापूर-तुळजापूर रस्त्याचे चौपदरीकरणासह विविध विकासकामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा बुधवारी सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार शरद बनसोडे, माजी आमदार आणि कामगार नेते नरसय्या आडम मास्तर आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना पुणेरी पगडी, घोंगडे, भगवदगीता आणि तलवार भेट देण्यात आली.

यावेळी मोदी यांनी साडेचार वर्षात भाजप सरकारने केलेल्या कामाच्या प्रगतीचा आलेख मांडताना विकासकामांना आडकाठी घालणाऱ्या कॉंग्रेस पक्षावर अप्रत्यक्षपणे टीकेची झोड उठविली. मराठीतून भाषणाला सुरुवात करत मोदी म्हणाले, कमिशनखोरांच्या विरोधात आपण व्यापक मोहीम हाती घेतली आहे. चौकीदाराला कितीही घाबवरण्याचा प्रयत्न केला, तरी तो घाबरणार नाही. त्याला माहिती मिळालीच पाहिजे, साफसफाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

“सबका साथ, सबका विकास’ हाच आमच्या सरकारचा नारा आहे. हेच आमचे संस्कार आणि संस्कृती आहे. दलित आणि आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू न देता लोकसभेत आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देणारे ऐतिहासिक विधेयक मंजूर झाले. लोकसभेत अजून एक बील काल पास झाले, ज्यामुळे पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान मधून भारतात आलेल्या बाधंवाना भारतीय नागरीकत्व मिळणार आहे. त्यांच्या अडचणी दूर होणार आहेत, असेही मोदी म्हणाले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)