नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील चित्रपटाबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाने आज सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. निवडणूक आयोगाने या चित्रपटाला लोकसभा निवडणुक पुर्ण होई पर्यंत बंदी घातली आहे. चित्रपटाच्या निर्मार्त्यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
हा चित्रपट संपुर्ण न पहाता केवळ प्रोमो पाहूनच आयोगाने हा निर्णय घेतल्याने तो रद्द बातल ठरवावा अशी या निर्मार्त्यांची मागणी आहे. त्यावर कोर्टाने निवडणूक आयोगाला संपुर्ण चित्रपटपाहून यावर आपला अहवाल सादर करावा अशी सुचना केली होती. त्यानुसार त्यांनी हा अहवाल आज सादर केला. याविषयावरील पुढील सुनावणी 26 एप्रिल रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या अहवालाची प्रत चित्रपटाच्या निर्मात्यालाही देण्यात यावी अशी सुचना न्यायालयाने आजच्या सुनावणीच्यावेळी केली.