#CWC19 : बर्गर, पिझ्झा आणि सानिया मिर्झा !

मॅंचेस्टर – पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारताकडून लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर पाकिस्तान संघावर सर्वच स्तरातून टीका करण्यास सुरूवात झाली आहे.

शोएब मलिक हा भारताचा सामना होण्याचे आदल्या दिवशी भारतीय पत्नी सानिया मिर्झाच्या समवेत भोजनासाठी गेला होता. त्यांनी पाकिस्तानच्या संघातील खेळाडूंसाठी संघ व्यवस्थापनाने केलेल्या आचारसंहितेचा उल्लंघन केल्याची चर्चा समाज माध्यमावर त्वरीत प्रसारित झाली होती. या जोडप्याप्रमाणे पाकिस्तानच्या खेळाडूंनी बर्गर, पिझ्झा आदी पदार्थांचा आस्वाद घेतला होता. त्यावरही पाकिस्तानच्या प्रसार माध्यमांनी टीका केली होती. याबाबतचे व्हिडिओही प्रसारित झाले आहेत.

त्यावर प्रतिक्रिया देताना सानिया हिने सांगितले, पत्नीसमवेत भोजन करणे हा काही गुन्हा नाही. सामना हरल्यानंतरही आम्ही भोजनास गेलो होतो. त्यामध्ये मला कोणतेही गैर वाटत नाही. प्रत्येक खेळाडूदेखील माणूसच असतो.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here