बॅडमिंटन स्पर्धा: कॉमेंट्‌स, ईगल्स, हॉक्‍स संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

सहावी पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धा

पुणे: कॉमेंट्‌स संघाने स्वान संघाचा, ईगल्स संघाने रेवन्स संघाचा तर हॉक्‍स संघाने फाल्कन्सचा पराभव करूनपीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित सहाव्या पीवायसी-ट्‍ररूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रवेश केला. पीवायसी हिंदू जिमखाना येथील बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत कॉमेट्‌स संघाने स्वान्स संघाचा 5-2असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॉमेट्‌सकडून सुधांशू मेडसीकर, पराग चोपडा, हर्षवर्धन आपटे, अनिकेत सहस्त्रबुद्धे, विनीत रुकारी, भरत कुवल, आदिती रोडे, संग्राम पाटील, जनक वाकणकर, भाग्यश्री देशपांडे, विवेक जोशी, अविनाश दोशी यांनी अफलातून कामगिरी केली.

दुसऱ्या सामन्यात सुमेध शहा, हर्षद बर्वे, अश्विन शहा, अमर श्रॉफ, आनंद घाटे, सचिन काळे, आकाश सूर्यवंशी, राजश्री भावे यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर हॉक्‍स संघाने फाल्कन्स संघाचा 4-3असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. अन्य लढतीत ईगल्स संघाने रेवन्स संघावर 5-2अशा फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)