INS विक्रमादित्यवरील आग नियंत्रणात; आगीत लेफ्टनंट कमांडर डी एस चौहान यांचा मृत्यू

कारवार : भारतीय नौदलाच्या विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आलं आहे. पण या आगीमध्ये लेफ्टनंट कमांडर डी एस चौहान या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, आज दुपारी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यला आग लागली. आग लागल्यानंतर यामध्ये लेफ्टनंट कमांडर डी.एस. चौहान गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आगीनंतर नौदलानं त्वरीत चौकशीचे आदेश दिले असून यामध्ये आगीच नेमकं कारण स्पष्ट होईल.

रशियन बनावटीची आयएनएस विक्रमादित्य ही नौदलाची सर्वात मोठी नौका आहे. रशियाकडून घेतल्यानंतर दीर्घकाळ प्रतीक्षेत राहिलेली ही युद्धनौका १४ जून २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलात दाखल झाली.

https://twitter.com/ANI/status/1121759485653991424

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)