कॉमेडी पुरे! आता थ्रिलर रोल्सच्या शोधात : कार्तिक आर्यन

मुंबई : प्यार का पंचनामा, सोनू के टिटू की शादी या चित्रपटांमधून आपल्या कॉमेडी पात्रांद्वारे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणाऱ्या कार्तिक आर्यन याला आता ‘सिरीयस’ रोल्स करण्याचे वेध लागले आहेत. ‘आपल्या हलक्या फुलक्या पात्रांना आपण खूप एन्जॉय केले मात्र आता आपल्याला काहीतरी वेगळं करायला आवडेल’ असं कार्तिक म्हणतो.

कार्तिकने यावेळी बोलताना त्याची व्हिलनची भूमिका साकारण्याची इच्छा देखील बोलून दाखवली. तो म्हणाला, “माझ्या मते कॉमेडी भूमिका साकारणं हे खूपच चॅलेंजिंग काम आहे. असे रोल साकारल्यानंतर जेव्हा प्रेक्षक तुमचा अभिनय एन्जॉय करत असतात तेव्हा खरंच खूप समाधान वाटत. तस पाहायला गेलं तर मला पर्सनली ‘व्हिलनच्या’ भूमिका पाहायला खूप आवडतात. जर मला अशी भूमिका मिळाली तर ती साकारायला मला नक्कीच आवडेल.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)