खर्शीचा पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंची मदत

लोकवर्गणीतून खोदली विहीर
उर्वरित कामासाठी आमदारफंडातून निधी

सातारा – आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खर्शी तर्फ कुडाळ गावचा पाणीप्रश्‍न निकाली काढला. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून विहीर खुदाई केली. त्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वत: एक लाख रुपयांची मदत केली. यामुळे विहिरीचे काम पूर्णत्वास गेले आणि विहिरीला मुबलक पाणी लागले. दरम्यान, पाइपलाइन, डी. पी. व अन्य कामांसाठी आमदार फंडातून निधी उपलब्ध करुन खर्शीचा पाणीप्रश्‍न संपुष्टात आणू, अशी ग्वाहीही शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली.

खर्शी या गावात जुनी पाणीपुरवठा योजना आहे. वाढत्या दुष्काळी परिस्थितीमुळे गावातील सार्वजनिक विहिरीला पाणी कमी पडू लागले. नवीन पाणी असलेल्या जागेत विहीर घेणे आवश्‍यक होते. त्यासाठी ग्रामस्थांची बैठक होऊन वाघजाई शिवारातील दोन गुंठे जमीन निवडण्यात आली. जागामालक चंद्रकांत साहेबराव भोसले, सूर्यकांत साहेबराव भोसले आणि मालती बाबासाहेब चव्हाण यांनी ही दोन गुंठे जमीन खर्शी ग्रामपंचायतीच्या नावे दानपत्र करुन मोफत गावासाठी दिली. यानंतर ग्रामस्थांनी प्रत्येक नळ कनेक्‍शनप्रमाणे दोन हजार रुपये लोकवर्गणी काढण्याचा निर्णय घेतला. विहिरीचे काम सुरु झाले. पण, रक्‍कम कमी पडू लागली.

यानंतर ग्रामस्थांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे मदतीचा हात मागितल्यावर त्यांनीही तात्काळ एक लाख रुपयांची मदत केली. विहिरीला मुबलक पाणी लागल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, पाइपलाइन, विद्युत कनेक्‍शन, डी. पी. आदी बाबींसाठी आमदार फंडातून निधी उपलब्ध करु आणि खर्शी गावचा पाणीप्रश्‍न कायमस्वरुपी निकाली काढू, असा शब्द शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला. शिवेंद्रसिंहराजे यांनी केलेल्या मदतीबद्दल पोलीस पाटील सुहास भोसले, सरपंच रामचंद्र मुळीक, उपसरपंच विठ्ठल शिवणकर, धैर्यशील भोसले, विजय भोसले, सुरेश शिवणकर, लक्ष्मण भोसले, डॉ. अशोक भिसे, विनायक शिवणकर, रामचंद्र जाधव, गुलाबराव भोसले, अशोक भोसले, अचलराव सोनावणे, सुधाकर नलवडे यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)