आ. थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा गुरुवारी स्वीकारणार पदभार

नगर – महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात हे 18 जुलै रोजी मुंबई येथे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यास पदभार स्वीकारणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांनी दिली.

मंगळवार रोजी दुपारी 1 वाजता मुंबई येथील मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात मावळते अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे. यावेळी आ. थोरात, नितीन राऊत, आ. बसवराज पाटील, आ. विश्‍वजीत कदम, आ. यशोमती ठाकुर, व मुजफ्फर हुसेन हे कार्याध्यक्षपदाचा पदभार स्विकारणार आहेत.

या पदग्रहण समारंभानंतर राज्यातील कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीस अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लीकार्जून खरगे व राज्यातील सर्व ज्येष्ठ मंडळी उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहे. या बैठकीसाठी राज्यातील जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश प्रतिनिधी, आदींना निमंत्रित करण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)