आ. पृथ्वीराज चव्हाण वाढदिवसाच्या शुभेच्छा स्विकारणार नाहीत

कराड – राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा) रविवार, दि. 17 रोजी दिल्ली येथे होणाऱ्या पक्षाच्या मिटींगसाठी उपस्थित राहणार असल्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी कराडमध्ये उपलब्ध असणार नाहीत.

रविवार, दि. 17 रोजी पृथ्वीराज बाबा यांचा वाढदिवस आहे. आ. चव्हाण यांनी कराड दक्षिणच्या सर्वांगीण विकासासाठी अद्वितीय असे काम केले आहे. मुख्यमंत्री पदापासून आजपर्यंत त्यांनी विकासाच्या कार्यात सातत्य राखले आहे. त्यांचा रविवारी वाढदिवस आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची दिल्ली येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठकीस ते उपस्थित राहणार असल्याने रविवारी शुभेच्छा स्विकारण्यासाठी कराडमध्ये उपलब्ध नाहीत, याची नोंद घ्यावी, असे आवाहन कराड दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष व मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले आहे. सर्व कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी, असेही शिंदे यांनी सांगितले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)