आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे स्टार प्रचारकांच्या यादीत नाव

कराड – कॉंग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश झाला आहे. कॉंग्रेसने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत अकराव्या क्रमांकावर आ. चव्हाण यांचे नाव आहे. त्यामुळे त्यांना साताऱ्यासह राज्य व देशभरातील विविध मतदारसंघातही प्रचारास निमंत्रित केले जाणार आहे.

त्यांनी यापूर्वीच केंद्र सरकारच्या अनेक धोरणांवर आक्रमकपणे हल्ले केले आहेत. राफेल विमान खरेदीतील अपहार प्रकरण, पंतप्रधान मोदी यांचे चुकलेले धोरण, पुलवामा घटनेनंतर आलेले अपयश अशा विविध मुद्यांवर चव्हाण यांनी अभ्यासपूर्ण मुद्दे उपस्थित केले आहेत. भाजप सरकारवर टीकास्त्र व थेट आरोप करणाऱ्या चव्हाण यांचा यामुळेच कॉंग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश झाला आहे. या यादीत सुशीलकुमार शिंदे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांचा समावेश आहे. त्याचा निश्‍चित फायदा सातारा लोकसभेसाठी होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)