नगर – राष्ट्रवादी, कॉंग्रेस व मित्रपक्षांचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारानिमित्त नगर शहरातून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी मतदारांच्या घराघरात जाऊन गाठीभेट घेण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर पदाधिकारी, युवक आघाडी, महिला आघाडी, अल्पसंख्याक विभाग, सामाजिक न्याय विभाग, बहुजन आघाडी, यासह सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक गणेश भोसले म्हणाले, आ. संग्राम जगताप यांनी खऱ्या अर्थाने नगर शहराचा विकास केला आहे. त्यामुळेच शहरातील नागरिकांकडून प्रचार फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.यावेळी प्रा. माणिक विधाते, संजय चोपडा, प्रकाश भागानगरे, महादेव कराळे, ज्ञानेश्वर रासकर, धर्मा करांडे, भाऊसाहेब पांडुळे, लकी खुबचंदानी, राजेंद्र बेंद्रे, प्रकाश कराळे, छबूराव कांडेकर उपस्थित होते.