ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाचा चक्रावून टाकणारा निर्णय 

विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थी गांजा ओढू शकणार
ओटावा: “टोबॅको इज अ सायलेंट किलर,’ असं म्हटलं जातं, अनेकांना या संदर्भात आपण माहिती देखील देत असतो. पण ज्ञानाचे पीठ म्हणणाऱ्या विद्यापीठात अशा गोष्टींना विरोध करण्याऐवजी परवानगी दिली जाते असे म्हटल्यावर कोणालाच पटणार नाही. मात्र, अशी परवानगी चक्‍क एका विद्यापीठाने दिली आहे. कॅनडातील प्रसिद्ध ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाने एक चक्रावून टाकणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता येथील विद्यार्थी विद्यापीठाच्या आवारात गांजा ओढू शकतात. येत्या 17 तारखेपासून कॅनडात गांजा सेवनावरील बंदी उठवली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशात गांजा सेवनावर कोणतेही निर्बंध राहणार नाहीत.
विशेष म्हणजे, गांजा सेवन करण्यासाठी विद्यापीठाने स्मोकिंग झोन सारखी विशेष जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या वेंकुवर परिसरात उघड्यावरही गांजा सेवनाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, विद्यापीठाची मुख्य इमारत आणि निवासी इमारतींपासून 8 मीटरच्या परिसरात उघड्यावर गांजा ओढण्यावर निर्बंध आहेत.
संशोधनात असे आढळून आले आहे की, एखाद्या व्यक्तीला विशिष्ट गोष्टीचे व्यसन असेल आणि त्याला रोखले तर लोक गैरमार्गाचा अवलंब करतात. यामधून अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आम्ही कोणतेही अडचणीचे नियम लादण्याच्या फंदात पडणार नाही, असे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)