कोल्हापूरात बेकायदा शस्त्रे जप्त; दोघांना अटक

– सतेज औंधकर  

कोल्हापूर – लोकांच्यात दहशत पसरविणे आणि काही घातपात करण्याच्या उद्देशाने बेकायदा धारदार शस्त्रे बाळगल्या प्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यतल्या शिरोळ परिसरातील टाकवडे इथल्या दोन तरुणांना शिरोळ पोलिसानी अटक केली आहे. सिध्देश्वर उर्फ मंदार महादेव पाटील आणि विवेक महादेव पाटील अशी त्याची नावं असुन या दोन तरुणांना शिरोळ पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मध्यरात्री उघडकीस आली आहे. संशयीत आरोपी कडून पोलिसांनी एक तलवार आणि चार धारदार कोयते अशी पाच शस्त्रे हस्तगत करून जप्त केली आहेत.

राज्यामध्ये लोकसभा निवडणुक पार्श्वभुमिवर आचार संहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गस्त घालत असताना खबऱ्या मार्फत बेकायदा शस्त्रा संबधी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार संशयीत मंदार आणि त्याचा मित्र विवेक यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता तलवार आणि कोयते अशी पाच शस्त्रे पोत्यात घालून कोडी मार्गावरील महादेव पाटील यांच्या पोल्ट्रीच्या मागे लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार शिरोळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ती पाच घातक शस्त्रे जप्त करून दोघांना अटक केलीय.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)