उत्तर भारतामध्ये थंडीची लाट

नवी दिल्ली: देशाच्या संपूर्ण उत्तर भागात गुरुवारी थंडीची लाट पसरली. थंडीबरोबर दाट धुक्‍यामुळेही विमान आणि रेल्वेसेवाही विस्कळीत झाली. राजधानी दिल्लीमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा कमी 3.7 अंश इतके नोंदवले गेले. दिल्लीतील हवेची गुणवत्ता “अतिशय खराब’ असल्याचे “एअर क्‍वालिटी ऍन्ड वेदर फोरकास्टिंग ऍन्ड रिसर्च’ (सफर) या निरीक्षक संस्थेने म्हटले आहे. दिल्लीच्या अनेक भागामध्ये आज सकाळी दाट धुके पसरले होते. त्यामुळे रस्ते वाहतुक धीम्या गतीने सुरु होती.

हिमाचल प्रदेशात मनाली आणि कल्पा येथे बर्फवृष्टीही झाली. हिमाचलमधील काही भागात पाऊस पडण्याचीही शक्‍यता आहे. उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट पसरली आहे. उत्तरकाशी आणि यमुना नदीच्या खोऱ्यात काही ठिकाणी पाण्याचे स्रोत गोठले आहेत. आणखी तीन दिवस थंडीची ही लाट कायम राहिल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जम्मू काश्‍मीरमध्ये या काळातील रात्रीचे तापमान गेल्या 28 वर्षातील सर्वात कमी म्हणजे वजा 7.3 अंश इतके नोंदवले गेले. यापूर्वी 31 डिसेंबर 2007 रोजी वजा 7.2 अंश तापमान नोंदवले गेले होते. द्रासमध्ये सर्वात कमी म्हणजे वजा 20 अंश तापमान नोंदवले गेले. राजस्थान, ओडिशा, पंजाब आदी राज्यांमध्येही थंडीची लाट पसरली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)